Kolkata Doctor Case: R G Kar Hospital मध्ये महिला डॉक्टरची हत्या करणारा आरोपी Sanjay Roy आहे कोण ?
#BolBhidu #KolkataDoctorDeath #RGKarMedicalCollegeCase
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये महिला डॉक्टरच्या हत्येचं प्रकरण सध्या देशभर गाजतंय. ३१ वर्षांच्या ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्यामुळं संपूर्ण बंगालमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय. एका सरकारी रुग्णालयात ही घटना घडल्यामुळं मेडिकलचे विद्यार्थी, डॉक्टर्स यांच्यासोबतच विरोधी पक्षही सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. हातात पोस्टर्स घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा द्यायची मागणी करत, विद्यार्थ्यांकडून वी वॉन्ट जस्टीसचे नारे देण्यात येतायंत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही आता जोर धरू लागलीय.
महत्वाचं म्हणजे हा आरोपी पोलिसांचाच सिव्हिल कर्मचारी असल्याचं समोर येतंय. त्याच्या चौकशीत आणि पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळं कोलकाता मधल्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरुन देशभरात संताप पहायला मिळतोय. कोलकातामध्ये महिला डॉक्टरसोबत नक्की काय घडलं, पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकार आणि प्रशासनावर काय आरोप होतायंत, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
